नागपूर: पुढील महिन्यात ६ एप्रिल रोजी तामीळनाडूमध्ये विधानसभेची (Tamil Nadu Assembly Election) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress)पक्षाने कंबर कसली आहे. तेथील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची (Star campaigner) यादी तयार केली आहे. या यादीत ऊर्जामंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. (Nitin Raut) यांच्या नावाचा समावेश केला आहे. डॉ. राऊत स्टार प्रचारक म्हणून तामिळनाडूत काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. (energy minister is the of the for the )
येत्या ६ एप्रिलला एकाच टप्प्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होत आहे. काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवनकुमार बंसल यांनी काँग्रेसच्या एकूण ३० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा बातमी-
महाराष्ट्रातून फक्त नितीन राऊत आणि संजय दत्त
काँग्रेसने तामिळनाडूत काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातून केवळ दोनच नेत्यांची निवड केली आहे. त्यातील पहिले नाव आहे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत याचे, तर दुसरे नाव आहे संजय दत्त यांचे.
क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times