अशा घटनांमुळे देश आणि त्याच्या धार्मिक सहिष्णुतेच्या प्रतिमेला ठेच पोहचवणाऱ्या आहेत. केंद्र सरकारने अशा घटनेची निंदा केली पाहिजे. या प्रकरणी आपण हस्तक्षेप करून या घटनेतील आरोपी आणि संघटनांविरोधात कारवाई करावी. घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यांवर गदा आणणारा हा प्रकार आहे, असं केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.
ही घटना १९ मार्चला घडली होती. हरिद्वारहून पुरीला जात असलेल्या उत्कल एक्स्प्रेसमध्ये काही जणांनी नन्सना घेरलं आणि त्यांना बळजबरीने ट्रेनमधून उतरवलं. या घटनेसंबंधीचा २५ सेकंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात नन्सना काही जणांनी घेरल्याचं दिसून येतंय. यात काही पोलीसही आहेत. तुमचे सामान घेऊन या. तुम्हाला पाठवण्यात येईल. घाबरू नाक, असा आवाज या व्हिडिओत येत आहे.
तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला सोडलं जाईल, असं व्हिडिओत पुढे म्हटलं गेलंय. हा आवाज पोलिसाचा आहे. यावर नन्स बोलतात, देशात असंच चालणार. त्यावरून पोलीस एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना दरडावत असल्याचं दिसून आलं. ट्रेनच्या बाहेर व्हा, नेतागिरी बंद करा, असं पोलीस म्हणाले.
दुसऱ्या एका व्हिडिओत महिला झाशी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आणि पोलीस ठाण्यात दिसून आल्या. ऋषिकेशवरून परतत असलेल्या एबीव्हीबीच्या कार्यकर्त्यांना दोन नन्स आणि दोन प्रशिक्षणार्थी महिलांवर संशय आला. या दोन नन्स त्यांच्यासोबतच्या महिलांचे बळजबरीने धर्म परिवर्तन करत असल्याचं कार्यकर्त्यांना वाटलं. त्याच ट्रेनमध्ये त्या होत्या. याप्रकरणी एबीव्हीबीचे अजय शंकर तिवारी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. नन्ससोबत असलेल्या दोन साध्या कपड्यांमधील महिला या जन्मापासूनच ख्रिश्चन आहेत आणि नन बनण्याच्या प्रशिक्षणासाठी त्यात जात असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांना सोडण्यात आलं, अशी माहिती रेल्वे पोलीस उपअधीक्षक नईम खान मंसूरी यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times