मुंबई: गेल्या वर्षी करोनाचा हॉटस्पोट ठरलेल्या धारावीत आत्तापर्यंत स्थिती नियंत्रणात असून करोनाच्या या दुसऱ्या लाटेत अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत आहे. ()

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनानं शिरकाव केल्यानंतर वरळीनंतर धारावी करोनाचा हॉटस्पोट ठरला होता. करोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेनं धारावी पॅटर्न राबवला होता. पालिकेच्या या पॅटर्नमुळं धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात आली होती. मात्र, यंदाच्या फेब्रुवारीत करोनानं पुन्हा उचल खालली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांच ५ हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र, यावेळी झोपडपट्टी व चाळीव्यतिरिक्त उच्चभ्रू वस्तीत करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे.

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक करोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसाला २०० ते ३०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं पालिकेची चिंता अधिक वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच अंधेरी पश्चिम भाग हा करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे.

अंधेरी पश्चिमभागातील वाढती रुग्णसंख्या पाहता लवकरच प्रशासन जुहू बीच बंद करण्याच्या तयारीत आहे. जुहू बीचवर पालिकेचे क्लिनअप मार्शल तैनात करण्यात येत आहेत. मास्कशिवाय दिसणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. तसंच, तिथं अँटिजेन टेस्टही करण्यात येत आहेत. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे सहआयुक्त माहिती विश्वास मोटे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईत काल उच्चांकी रुग्णवाढ झाली आहे. बुधवारी ५ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, पालिकेनं काल मुंबईतील ६० इमारती सील केल्या आहेत. त्यामुळं सध्या मुंबईत एकूण ४३२ इमारती सील आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here