सिंधुदुर्ग: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपने शिवसेनेला शह देत एकतर्फी विजय मिळवला आहे. आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या या निवडणुकीत सुरुवातीला भाजपचा एक नाराज गट शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य यांनी यात लक्ष घातलं आणि चित्र पालटलं. ( Latest News )

वाचा:

भाजपसाठी राणे पॅटर्न पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं चित्र या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळालं. ५० सदस्यसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३० विरुद्ध १९ मतांनी विजय मिळवत भाजपच्या संजना सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा पराभव केला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कणकवलीचे भाजप आमदार यांना उचलून घेत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वाचा:

आमदार नितेश राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले. ‘सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून आम्हाला आव्हान वा धक्का द्यायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील’, असा इशारा नितेश यांनी शिवसेनेला दिला. आज शिवसेनेची व महाविकास आघाडीची जी काही अवस्था आहे ते पाहता त्या बुडत्या जहाजामधे कोण जावून बसणार, असा सवालही नितेश राणे यांनी केला. राज्यातल्या सरकारचे मोजकेच दिवस आता उरले आहेत, असा दावाही नितेश यांनी केला. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावरही नितेश यांनी निशाणा साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे वैभव नाईक हे आम्हाला आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे नितेश म्हणाले.

वाचा:

दरम्यान, सांगली पालिकेत महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला होता. भाजपचं बहुमत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यूहरचना आखत सत्तेची समीकरणे बदली. भाजपचा एक गट फोडत महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांना धक्का देत शिवसेनेने जळगाव महापालिकेत विजय खेचून आणला. भाजपात उभी फूट पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली व तिथे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. अशाच प्रकारचा धक्का शिवसेना सिंधुदुर्गात राणे यांना देणार असे बोलले जात होते. मात्र, खुद्द नारायण राणे यांनी सूत्रे हाती घेतली व शिवसेनेचा मनसुबा उधळला गेला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here