मार्कंडेय रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजनचा प्लांट आहे. या प्लांटच्या दोन टाक्या असून त्यापैकी एक चालू अवस्थेत तर दुसरी बंद आहे. त्यातील बंद अवस्थेत असलेल्या टाकीत रासायनिक रिऍक्शनमुळे स्फोट झाला. हा स्फोट इतका भंयकर होता की टाकीच्या आतली पावडर पाचशे फुटांपर्यंत उडाली अन हवेत धुळीचे लोळ उठले. ही पावडर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या अंगावर पण उडाली. त्यामुळं सर्वत्र एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती .नेमकं काय घडलं हे कुणालाच कळायला मार्ग नव्हता त्यामुळं रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भयभीत होऊन गेले होते.
दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली आहे. मात्र, या स्फोटानंतर रुग्णालयातील रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले होतं. असं सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times