‘युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही, असं राऊत म्हणाले आहेत. तसंच, काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची अशी भूमिका आहे,’ असं राऊतांनी म्हटलं आहे.
‘सोनिया गांधींचीही तशीच भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व केल. पण सध्या त्यांची प्रकृती खराब असते. देशात अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अंत्यत विकलांग अवस्थेत आहे. युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं,’ असं मत राऊत यांनी मांडलं आहे.
दरम्यान, राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्राची चौकशी करा अशी मागणी केली होती. यावर बोट ठेवत संजय राऊत यांनीही ‘चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,’ असं म्हणत फडणवीसांवर टोला लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times