मुंबई: महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगला असताना एकीकडे हे क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसले. तर, क्रिकेटच्या मैदानावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील एका क्रिकेट सामन्याच्या उद्धाटनाला फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली आहे. लहानपणी मी बॅटिंग बॉलिंग दोन्हीपण करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. पण आता माझं ठरलं आहे. मी बॉलिंग पण करणार, गुगली पण टाकणार आणि जेव्हा बॅटिंग करेन तेव्हा तीही चांगली करेन, असं म्हणत सरकारला टोला लगावला आहे.

सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. ते मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागत आहेत. आणि बॉलिंगबद्दल बोलायचं झाल्यासं मी बॉडिलाइन बॉलिंग करतच नाही मी लॉजिकलं आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळं समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होतं असं मला वाटतं, अशी टिकाही त्यांनी केली आहे.

रश्मी शुक्ला प्रकरणावरही देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर सवाल उपस्थित केला आहे. माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची?, ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं या करता आम्ही चौकशी करु हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कोणाला पाठिशी घालतंय हे दिसतंय, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी युपीएच्या अध्यक्षपदावर केलेल्या विधानावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. युपीएचा कॅप्टन बदला हे सोळाव गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here