केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र हे आभार मानत असताना ४५ वर्षांच्या खालील व्यक्तींनाही होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. काही घरांमध्ये करोना बाधितांची संख्या अधिक असल्याचे सांगताना माझ्या देवगिरी बंगल्यामध्येही असलेल्या स्टाफपैकी तब्बल ९ जणांना करोनाची लागण झाल्याचे पवार म्हणाले.
माझ्या देवगिरी या बंगल्यावर मोठ्या संख्येने स्टाफ काम करतो. त्या स्टाफबरोबरच तिथे इतरही लोक आहेत. मी काल सगळ्यांची तपासणी करुन घेतली तेव्हा नऊ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात वाढत असलेल्या करोनाबाबत चिंता व्यक्त करत या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचे पवार म्हणाले. करोनाशी लढ देण्यासाठी आवश्यक तो निधी वितरीत केला जाईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
उद्या, शुक्रवारी पुण्यात वाढत्या करोनाला पायबंद घालण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली असून या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रितिनिधींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे असेही पवार म्हणाले. सर्वांनी मिळून करोनाचा सामना करायचा असून या कामात पक्षीय राजकारण आणता कामा नये. तसेच जातीपातीचा विचार न करता या संकटाचा सामना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times