आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा ताईंनी आतापर्यंत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा ताई ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर आणि त्यानंतर मुंबईत आलं. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणं गायला सुरुवात केली.
आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार
५ मे २००८ रोजी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.
२००० मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
आशा भोसले यांनी सातवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे तर १८ वेळा त्यांना नामांकनही मिळालं आहे.
याशिवाय दोनवेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
२०१५ च्या बीबीसीच्या १०० इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचं नाव होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times