देशातील एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. तर ७० टक्के त्यांची (हिंदू) आहे. ७० टक्के लोकसंख्या असल्यामुळे ते सत्तेत येऊ शकतात. पण आपण त्यांना रोखू शकतो. आपण ३० टक्के मुस्लिम एकजूट झालो तर ४ पाकिस्तान तयारी होतील. आणि त्यावेळी ही ७० टक्के लोकसंख्या कुठे जाईल? असं वादग्रस्त वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे नेते ( ) यांनी केलंय.
भारताच्या विभाजनावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आणि पक्षाचे नेते शेख आलम यांच्यावर जोरदार टीका होतेय. यानंतर शेख आलम यांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times