मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा ‘रूही’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटासाठी जान्हवीनं बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे आता या चित्रपटाच्या यशानंतर जान्हवी व्हेकेशनसाठी लॉस एंजेलिसला गेली आहे. काही वेळापूर्वीच जान्हवीनं या ठिकाणचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक मुलगा दिसत आहे. ज्यावरून सोशल मीडियावर जान्हवीच्या नावाची चर्चा सुरू आहे.

जान्हवीनं तिच्या लॉस एंजेलिसच्या व्हेकेशनचे काही सुंदर फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना जान्हवीनं लिहिलं, ‘काही मिनिटांपूर्वीच मी लॉस एंजेलिसमध्ये आले आहे.. आणि मला हे सर्व माझ्या घराप्रमाणे वाटत आहे.’ या फोटोमध्ये जान्हवी पिंक टॉप आणि व्हाइट जीनमध्ये दिसत आहे. तसेच जान्हवीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक मुलगा सुद्धा दिसत आहे. ज्यावरून तिच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये तिला याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

जान्हवीन तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमधील मुलाला पाहून तिचे चाहते सुद्धा चकित झाले आहे. अनेकांनी फोटोमध्ये दिसत असलेला मुलगा कोण असा प्रश्न जान्हवीला केला आहे. लॉस एंजेलिसच्या समुद्र किनाऱ्यावर जान्हवी सध्या एन्जॉय करत आहे. तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्या मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही पण त्याचं नाव रोहन जौरा (Rohan Jaura)असल्याचं समजतं. जान्हवीनं या पोस्टमध्ये त्याला सुद्धा टॅग केलं आहे. पण तो केवळ तिचा मित्र आहे की या दोघांमध्ये त्याहून जास्त काही नातं आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर येत्या काळात ती बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांसाठी ती जोरदार तयारी सुद्धा करत आहे. तिच्याकडे सध्या सिद्धार्थ सेनगुप्ताचा ‘गुड लक जेरी’, कॉलिन डि शुन्हाचा ‘दोस्ताना’, शशांक खेतानचा ‘मिस्टर लेले’ आणि करण जोहरचा ‘तख्त’ हे चित्रपट आहेत. या व्यतिरिक्त दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू सोबत ‘पॅन इंडिया’ या चित्रपटातून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here