अर्जुन तेंडुलकरचे नाव जेव्हा आयपीएलच्या लिलावाच्या यादीत आले होते तेव्हा त्याला कोणता संघ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुनला त्याची बेस प्राइज मोजत त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले होते. यावेळी मुंबई इंडियन्सने अर्जुनला संघात घेण्यासाठी २० लाख रुपये मोजले होते. त्यानंतर अर्जुनला काही जणांनी ट्रोलही केले होते.
अर्जुन जेव्हा आयपीएल खेळणार असल्याचे समजले, तेव्हा चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते. त्याचबरोबर जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करुन घेतले, तेव्हाही जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले आहे, पण त्याला खेळायची संधी देणार का, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर अर्जुनला संधी दिल्यावर तो कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. एका जगविख्यात क्रिकेटपटूचा मुलगा असल्यामुळे अर्जुनवर नक्कीच दडपण असेल. पण हे दडपण तो जुगारुन देऊ शकतो की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे या आयपीएलमध्ये अर्जुन कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
यावर्षीच्या आयपीएलला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएलमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज एकमेकांसमोर उभे ठेकले जाणार आहे. मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी विक्रमी पाचवे जेतेपद पटकावले होते, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला अजूनपर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times