म. टा. प्रतिनिधी,

बाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) करायचे की आणखी कडक निर्बंध (strict restrictions), याबाबतचा निर्णय आज, शुक्रवारी घेतला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार () यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. (A decision will be taken today on whether to declare a in or impose )

पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत काउन्सिल हॉल येथे आज सकाळी दहा वाजता आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आणखी कडक निर्बंध लावायचे की काही दिवसांसाठी लॉकडाउन करायचे, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या मुद्यांवर होणार चर्चा

उपमुख्यमंत्री पवार हे दर शुक्रवारी करोनाबाबतची आढावा बैठक घेत असतात. मात्र, गेल्या आठवड्यात बैठक झाली नव्हती. आता रुग्णसंख्या ही वाढत असल्याने लॉकडाउन करायचे की निर्बंधांचे स्वरुप बदलायचे, यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये संचारबंदीची वेळ ही रात्री अकरा ते सकाळी सहाऐवजी आणखी कमी करणे, शाळा आणि महाविद्यालये ही यापुढेही बंद ठेवणे, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा आणखी कमी करणे, हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा देणे, दुकानांच्या वेळा कमी करणे आदी निर्बंधांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here