वाचा:
महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या दिपाली चव्हाण या मराठवाड्यातील मूळ रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
वाचा:
आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दिपाली यांच्या निवासस्थानावरून गोळी झाडल्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक, वन कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावत पोहोचले. यावेळी दिपाली चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. गोळी झाडण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी नऊ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिपाली चव्हाण यांनी लिहीलेली चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीवरून त्यांच्या आत्महत्येचे कारण उघडकीस येणार आहे.
वाचा:
दिपाली यांचा मृतदेह धारणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. घटनास्थळीच घटनेचा पंचनामा करण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह धारणीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. उद्या सकाळी उत्तरीय तपासणी उरकून मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी व त्यांची टीम पुढील तपास करत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times