करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजीपाला, फळे आणि दूध उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘कॉप शॉप’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार असून, आता गृहनिर्माण संस्थांमध्ये कायमस्वरुपी कॉप शॉप उघडले जाणार आहेत. त्या माध्यमातून थेट शेतकरी हे सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतमाल हे विकू शकणार आहेत. या उपक्रमाला आंबे विक्रीपासून सुरुवात केली जाणार आहे. ( will be opened in in )
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ यांच्या वतीने वेबिनाररचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. वेबिनारला महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे, उपाध्यक्ष सुहास पटवर्धन, ‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, प्रकाश दरेकर आदी सहभागी झाले होते.
‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल हा थेट ग्राहकांना मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या आवारात ‘कॉप शॉप’साठी जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तयार केलेला शेतमाल हा ग्राहकांना मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमाला आंबे विक्रीपासून सुरुवात करण्यात येणार आहे’ असे आकरे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
‘या योजनेमुळे भाजीपाला, फळे, दूध आदी शेतमाल हा कोठे तयार झाला आहे, तो कोणी उत्पादित केला आहे, ही माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार होणार आहे’ असे आकरे यांनी स्पष्ट केले.
‘करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागरिकांना सोसायटीमध्ये भाजीपाला, फळे आणि दूध उपलब्ध करून देण्यासाठी ‘कॉप शॉप’ सुरू करण्यात आले. आता ही व्यवस्था कायमस्वरुपी मिळण्यासाठी प्रमुख शहरांतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’ असे आकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘या योजनेचा लाभ गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट यांना घेता येणार आहे. त्यातून नागरिकांना शेतमाल हा थेट घरापर्यंत मिळणार आहे. या उपक्रमामध्ये गृहनिर्माण संस्थांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन पटवर्धन यांनी केले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times