बाजार बळजबरीने बंद केले जाणार नाही. कारण अनेक व्यापारी आणि कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे, असं संयुक्त किसान मोर्चाचे नेते रुलदा सिंह मानसा यांनी चंदीगडमध्ये सांगितलं. रास्ता रोकोसह रेल रोकोही केला जाईल आणि धरणे आंदोलन करून रेल्वे वाहतूक रोखली जाईल. आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद केल्या जातील, असं संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांने सांगितलं. लाल किल्ल्यावरील हिंसेत सामील असलेला लक्खा सिधाना शेतकऱ्यांच्या मंचावर येऊन बोलू शकतो. पण दीप सिद्धूला परवानगी नाही. दिल्ली पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याला अटक करून दाखवावी, असं सिधाना रुल्दा सिंग म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १२० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे २६ मार्चला संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस, डाव्यांसह इतर विरोधी पक्षांनीही या आंदोलना पाठिंबा दिला आहे. तर २८ मार्चला होळीच्या दिवशी कृषी कायद्यांच्या प्रति जाळण्यात येणार आहेत.
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, ती राज्य भारत बंदमधून वगळण्यात आली आहेत. तसंच या ‘भारत बंद’चा परिणाम २६ मार्चला दिल्लीतही दिसून येईल, असा दावा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times