कोल्हापूर: सयाजी हॉटेल, ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा चुकविणारे राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी साळोखेनगर येथील त्यांच्या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या शाळा व कॉलेज इमारतीचा सात वर्षे घरफाळाच भरला नाही व इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र न घेताच कॉलेज सुरू ठेवल्याचा आरोप माजी नगरसेवक व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. ( )

वाचा:

कोल्हापुरात गेले महिनाभर घरफाळा विषयावरून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी खासदार यांच्यात संघर्ष सुरू आहे. मंत्र्यांनी सयाजी हॉटेलचा १५ कोटींचा घरफाळा बुडविल्याचा आरोप महाडिक यांनी केला होता. त्यानंतर पाटील समर्थकांनी हा आरोप खोटा असल्याचे सांगत महाडिक यांच्यावरही अनेक आरोप केले. या पार्श्वभूमीवर कदम बंधूनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेचा घरफाळा बुडविण्यात पालकमंत्री आघाडीवर असून या प्रकरणी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वाचा:

सुनील कदम म्हणाले, प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर मंत्र्यांनी इंजिनीअरिंग कॉलेज सुरू केले. सात वर्षांपासून येथे कॉलेज सुरू आहे. मात्र अद्याप त्याचे भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. सात वर्षांत एक रुपयाही घरफाळा भरला नाही. महापालिकेच्या महसूलावर दरोडा घालणारे हे मंत्री आहेत. सत्तेच्या जोरावर दादागिरी करत ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना दम देतात. हे राज्यमंत्री आहेत म्हणून यांना वेगळा कायदा आहे का असा सवाल करून कदम म्हणाले, सध्या याच इमारतीत विनापरवाना बांधकाम सुरू आहे. गेल्या दहा वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

महापालिकेत प्रशासनाने दोनशे कोटीचा घरफाळा घोटाळा केल्याचा आरोप करून कदम म्हणाले, आठ वर्षे या विभागाचे लेखापरिक्षण केले नाही. हिम्मत असेल तर प्रशासनाने गृहराज्यमंत्र्याकडून घरफाळा वसूल करावा. सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि मंत्र्यांना एक न्याय असे वागू नये.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here