वाचा:
अकोल्याचे पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्त्वाखाली शाखेचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. अकोल्यात बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले होते. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा बाइक चालकांवर कारवाई सुरू केली होती. या बाइक्सचे सायलेन्सर काढण्यात आले. त्यानंतर ते रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले.
वाचा:
ही कारवाई करतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे. रस्त्यावर रांगेत सर्व सायलेन्सर मांडून त्यावरून रोड रोलर फिरवण्यात आला व हे सर्व सायलेन्सर नष्ट करण्यात आले. या कारवाईबाबत गजानन शेळके यांनी अधिक माहिती दिली. ‘बाइकचा मूळ सायलेन्सर बदलत मोठा आवाज करणारे डुप्लिकेट सायलेन्सर लावून दुचाकी चालवल्या जात असल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांनी शहर वाहतूक शाखेकडे केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने एक विशेष मोहीम मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून राबवली होती. त्यात अनेक दुचाकींचे सायलेन्सर आम्ही काढून घेतले होते व कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या दुचाकी नंतर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. मात्र जप्त केलेले डुप्लिकेट सायलेन्सर आमच्या कार्यालयातच होते. त्याची कायदेशीर विल्हेवाट लावावी लागणार होती. म्हणून आम्ही न्यायालयाची परवानगी घेतली आणि त्यानुसार रोड रोलरखाली हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत, असे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. असे सायलेन्सर पुन्हा दुचाकीला लावले जाणार नाहीत आणि ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास झाला तो परत होणार नाही, याच उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे, असेही शेळके यांनी पुढे नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times