मुंबई: भांडूप येथील सनराइझ रुग्णालयाच्या (Sunrise Hospital) बाजूला असलेल्या ड्रिम्स मॉलमध्ये (Dreams Mall) लागलेल्या आगीमुळे रुग्णालयातील रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व रुग्ण सुरक्षित असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. ( in mumbai affected all patients were shifted to fortis hospital)

सनराइझ रुग्णालयाच्या बाजूच्या जागेत आग लागल्याने या आगीचा धूर रुग्णालयात पसरला. त्यामुळे रुग्णालयातील फायर अलार्म वाजल्यानंतर रुग्णालयात सर्वांचीच एकच धावपळ उडाली. हे कोविड रुग्णालय आहे. अचानक उद्भवलेल्या या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तेथे त्यांना प्राणवायूची व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णालयातील डॉक्टर त्यांची काळजी घेत असल्याचे डॉ. निकिता त्रेहन यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
या रुग्णालयातील रुग्णांना नंतर फोर्टीज रुग्णालयात हलवण्याच आल्याची माहिती मिळत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
ही आग सुमारे पावणे बाराच्या सुमारास लागल्याचे अग्निशमन दलाने कळवले आहे. आगीच माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here