नवी दिल्लीः बँक घोटाळ्यांप्रकरणी सीबीआयने ११ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणांवर छापे ( ) टाकलेत. ही कारवाई गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधातील मोहीमेचा एक भाग आहे. ३७०० कोटी रुपयांहून अधिक कथित बँक घोटाळ्याप्रकरणी १०० हून अधिक ( bank fraud cases ) ठिकाणी छापेमारी केली गेली. ही करावाई बँक घोटाळ्यांच्या ३० हून अधिक प्रकरणांसंबधी केली गेली, असं सीबीआयकडून सांगण्यात आलं

बँक गैरव्यवहारांप्रकरणी सीबीआयने ओव्हरसीज बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, आयडीबीआय, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि सेंट्रल बँकेकडून तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी दिली. बँक गैरव्यवहार प्रकरणात अनेक कंपन्या दिवाळखोरीत दिसून आल्या. या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेतलं होतं. आता ते कर्ज एनपीए होत आहे. यामुळे सरकारी बँकांचं मोठं नुकसान होतंय, असं जोशी यांनी सांगितलं.

मुंबई, दिल्ली, कानपूर, गाझियाबाद, मथुरा, नोएडा, गुरुग्राम, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, सुरत, बडोद्यासह अनेक मोठ्या ठिकाणांवर छापे टाकले गेले. सीबीआयला अनेक बँकांमधून घोटाळे, पैशांची हेराफेरी, बनावट कागदपत्र देऊन कर्ज घेण्यासारख्या तक्रारी आल्या होत्या.

बँकांमधील गैरव्यवहारांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सखोल तपासानंतर त्यांना दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. पण छाप्यांमध्ये का आढळून आलं आणि किती जणांवर कारवाई केली जाणार आहे, याची कुठलीच माहिती सीबीआयकडून देण्यात आलेली नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here