वाचा:
होळी, व रंगपंचमीबाबत गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या अनुषंगाने राज्यात गेल्या वर्षभरात सर्वच सण व उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. आता पुन्हा करोनाचे रुग्ण वाढत असताना येणारा होळी सण तसेच धूलिवंदन आणि रंगपंचमीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे मार्गदर्शक सूचना जारी करताना नमूद करण्यात आले आहे.
वाचा:
अशा आहेत मार्गदर्शक सूचना:
१. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता २८ मार्च रोजी होळी/शिमगा हा सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा.
२. होळीत २९ मार्च रोजी धूलिवंदन तर २ एप्रिल रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावेळी एकमेकांवर रंग टाकला जातो, पाणी टाकले जाते तसेच गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. हे सणही साधेपणाने साजरे करण्यात यावेत. त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनजागृती करावी.
३. शिमगोत्सवात खास करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्या. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन होईल यासाठी दक्षता घ्यावी.
४. होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.
५. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लादले असतील तर ते लागू राहतील. शिवाय या परिपत्रकानंतरही कडक निर्बंध लादता येतील. या मार्गदर्शक सूचना मात्र यापेक्षा शिथील केल्या जाणार नाहीत.
६. १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे विविध विभाग तसेच स्थानिक प्रशासन वा पोलीस प्रशासनाने जे नियम लागू केले आहेत त्यांचेही काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times