मुंबई– अभिनेता बॉलिवूडच्या त्या अभिनेत्यांपैकी आहे ज्याने कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांना अनेक बड्या अभिनेत्यांचा अभिनय त्याच्यासमोर फिका वाटू लागला. प्रेक्षकांमध्ये नवाजुद्दीनच्या अभिनयाच्या चर्चा रंगू लागल्या. एकेकाळी कोणतीही ओळख नसणाऱ्या या अभिनेत्याच्या घराबाहेर चित्रपटाच्या निर्मात्यांची रांग लागली. नवाजुद्दीन लवकरच एका नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर दिली. त्यासोबतच नवाजुद्दीनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला जो काही वेळातच त्याने डिलीट केला. परंतु, अभिनेत्री आणि गायिका असलेल्या सुनंदा शर्माने तो व्हिडीओ पुन्हा पोस्ट केला.

नवाजुद्दीन पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. त्याच्यासोबत पंजाबी गायिका सुनंदा शर्मादेखील असणार आहे. नवाजुद्दीनने त्याच्या गाण्याचा इन्स्टाग्राम रील बनवून पोस्ट केला होता. त्यासोबत लिहिलं होतं, ‘सुर्यालादेखील सांगा हे माझं पाहिलं इन्स्टाग्राम रील आहे. पूर्ण गाणं २७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत तुम्ही या गाण्यावर रील बनवा. काही चांगले रिल्स मी माझ्या स्टोरीला शेअर करेन.’ यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. परंतु, त्या गाण्याची गायिका आणि अभिनेत्री असलेली सुनंदा हिने तो व्हिडीओ पुन्हा तिच्या अकाउंटवर शेअर केला.

नवाजुद्दीन लवकरच सुनंदासोबत एका म्युजिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे. या गाण्याचे बोल ‘बारिश की जाये’ असे असून हे गाणं २७ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. गाण्याला बी प्राकने आवाज दिला असून चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय. नवाजुद्दीन यापूर्वी २०२० सालच्या ‘सिरीयस मॅन’ मध्ये दिसला होता. त्यासोबतच ‘थालापति 65’ या दाक्षिणात्य चित्रपटात नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here