कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं आज भारत बंदचं आवाहन केलं आहे. या बंदचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या आंदोलनाबाबतचे सर्व लाइव्ह अपडेट्स:
शेतकऱ्यांच्या भारत बंदला कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
अहमदनगर: शेतकऱ्यांच्या बंदमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग नाही, नगरच्या बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू
(क्लिक करा आणि वाचा)
अहमदनगर: नगरमध्ये जिल्हा शेतकरी-कामगार संयुक्त समितीतर्फे सकाळी साडेअकरा वाजता नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको.
महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचाही बंदला पाठिंबा
केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांची आज भारत बंदची हाक
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times