वाचा:
दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांशी चर्चा केली. जखमी व इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ड्रीम्स मॉलमधील आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाला जबाबादार असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं त्यांनी सांगितलं.
वाचा:
‘कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रुग्णालयाला देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर मी राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेली राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times