पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस हॉस्पिटलला लागलेल्या आगीची पाहणी केली. सनराईस हॉस्पिटलला लागलेली आग अत्यंत भीषण आहे. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.
काल मध्यरात्री ड्रीम मॉल आणि सनराईस रुग्णालयात ही आग लागली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दहा जणांमध्ये दोन कोविड रुग्णांचा समावेश असल्याचीही माहिती मिळत आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल ११ तास लागले.
क्लिक करा आणि वाचा-
ड्रीम मॉलमधील सनराइझ रुग्णालयात एकूण ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या भीषण आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी ६१ जणांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत अडकलेल्या चार जणांचा अजूनही शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ही आग मॉलच्या चारही बाजूंना पसरली होती. या कारणामुळे बचाव कामात अडथळे येत होते. मात्र, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आता येथे अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
क्लिक करा आणि वाचा-
भांडूपमधील ड्रीम मॉलला मध्यरात्री २३ वाजण्याच्या सुमाराला ही भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे ३० बंब ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी भेट दिली. दाखल झाले. यावेळी महापौरांनी घटनेची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. यावेळी त्यांनी मॉलमध्ये हॉस्पिटल पहिल्यांदाच पाहिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून केली जाईल,’ असे महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times