पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी कोविडची लस घेतानाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. उपमुख्यमंत्री यांचा फोटो मात्र कुठेही दिसला नव्हता. पुण्यात आज पत्रकारांनी नेमका तोच प्रश्न विचारला. या प्रश्नाला अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ( on )

वाचा:

अजित पवारांच्या उपस्थितीत आज शहर व जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी कोविड संदर्भातील सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. लसीकरणाच्या सुविधा वाढवणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. १ एप्रिलनंतर ४५ वर्षांच्या पुढील पत्रकारांनी लस घ्यावी. आमचे सहकारी देखील घेणार आहेत, असं ते म्हणाले. तोच धागा पकडून, तुम्ही कधी लस घेणार? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर मी आधीच लस घेतली आहे असं ते म्हणाले. मग लस घेतानाचा फोटो का टाकला नाही, असं त्यांना विचारण्यात आलं.

या प्रश्नावर अजितदादांनी खुसखुशीत उत्तर दिलं. ‘मी फोटोसाठी हे करत नाही. फोटो काढून ते दाखवायला आपल्याला जमत नाही. मोठ्या लोकांनी फोटो काढले कारण त्यांचा आदर्श समोर ठेवून लोक लस घेतील. लस घेतानाचा माझा फोटो दाखवला तर घेणारेही घेणार नाहीत,’ असं अजितदादांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

यात राजकारण करून चालणार नाही!

‘पुणे जिल्ह्यात रुगसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचे पथक आले होते. या पथकाकडून चाचण्यांवर भर देण्याचेच निर्देश दिले होते. त्यानुसार काम सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या राज्यात जास्त आहे. त्याचबरोबर, चाचण्यांमध्येही राज्य देशात प्रथम आहे. यामध्ये राजकारण करून चालणार नाही,’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here