प्रवीण खंदारे ।

नांदेड जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र मागील काही दिवसात करोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या मृत्यूंमुळे मृतांच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी बारा-बारा तास वाट पाहावी लागत आहे.

करोना आजारामुळे आता मृत्यूची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला. शहरातील मृत रुग्णांचा गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांग लागली होती. अक्षरशः स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली.

वाचा:

वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने टाळेबंदी घोषित केली आहे. २४ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत ही टाळेबंदी असणार आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत ३५ हजाराच्या पुढे गेली आहे तर आतापर्यंत ६८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये करोनाची दहशत आहे. गोवर्धन घाट स्मशानभूमीत लोखंडी स्टँडची संख्या कमी आहे, त्यातच अचानक मृतांची संख्या वाढल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. स्मशानभूमीच्या आवारात लाकडे रचून करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. करोनामुळे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि पोलिसांची एनओसी आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here