सोलापूर: महावितरणच्या (MSEDCL) कर्मचाऱ्याला केल्याप्रकरणी सोलापूरचे (Rajesh Kale) यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आलीय. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. नेहरु नगर-जुळे या भागात वारंवार वीज खंडित होत असते. याबाबतचा काळे जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र पुढे वाद वाढत गेला आणि त्यातून हा प्रकार घडला. अझीम सय्यद असे मारहाण झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ( Rajesh Kale arrested for assaulting a )

ही घटना महावितरणच्या कोटणीस नगर येथील कार्यालयात घडली. यावेळी काळे यांच्या सोबत त्यांचे इतर पाच सहकारीही उपस्थित होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उपमहापौर काळे यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात रितसर भा.दं.वि. कलम ३५३, अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच उपमहापौर राजेश काळे यांना रात्री पोलिसांनी अटक केली, तर विजापूर नाका पोलीस त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
या घटनेत सार्वजनिक वीज खंडित होत असल्याचे कारण सांगितले जात असले तरी उपमहापौर काळे यांचे मित्र म्हेत्रे यांचे घरगुती वीज कनेक्शन का तोडले या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे, अशी माहिती मिळते. त्यामुळे भाजपचे उपमहापौर राजेश काळे अडचणीत आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
यापूर्वी काळे यांनी सोलापूर महानगर पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना ही अशाच प्रकारे धमकावले होते. त्यामुळे उपमहापौर काळे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करता त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय तयार करत असून कालच्या गुन्ह्याने त्यात आणखी एका गुन्ह्याची भरच पडलीय.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here