पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशमध्ये आणि भारतातही प्रयत्न सुरू होते. बांगलादेशमधील जनतेची भावना भारतीयांना समजत होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्याली पहिल्या आंदोलनांपैकी एक आहे. मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षाला समाजातील प्रत्येक स्तरातून पाठिंबा मिळाला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचाराची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती असेही त्यांनी सांगितले.
वाचा:
भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची सरकार सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परस्परांमधील आत्मविश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक अडचणी, समस्यांवर तोडगा काढला जाऊ शकतो. सीमा प्रश्नी झालेला करार हा हेच दर्शवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बांगलादेशच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे एकाच वेळी येत आहे. दोन्ही देशांसाठी २१ शतकात आगामी २५ वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. दोन्ही देशांचा वारसा सारखाच असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
वाचा:
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेले भारतीय जवान, मुक्तिसेनेचे जवान, नागरिक यांना आदरांजली वाहत असल्याचे सांगितले. बांगलादेशच्या सर्व नागरिकांना भारतीयांकडून या ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times