श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवरील सदस्यांची पहिली बैठक प्रयागराज येथे १९ फेब्रुवारीला होणार होती. ही बैठक आता नवी दिल्लीत होणार आहे. सर्व सदस्य १८ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत दाखल होणार आहेत. रामजन्मभूमीवर भव्य-दिव्य असे राम मंदिर उभारण्यावर या बैठकीत चर्चा केली जाईल. तसंच मंदिराचं बांधकाम कधी सुरू करायचं? याची तारीखही या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.
आधी ६७ एकर जमिनीचे मोजमाप केले जाईल. यानंतर ही जमीन समतोल केली जाईल. मग शिलान्यस केला जाईल. आणि मंदिराचे बांधकाम विशेष तिथी आणि दिवस पाहून सुरू केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं चौपाल यांनी सांगितलं. श्रीराम मंदिरासाठी ६७ एकर जमीन पुरेशी नाही. आणखी जमिनीची गरज आहे, असंही ते म्हणाले. एका इंग्रजी वेबसाइटला त्यांनी ही माहिती दिली.
अयोध्ये श्रीराम उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारीला लोकसभेत स्वतंत्र ट्रस्टची निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असं या ट्रस्टचं नाव त्यांनी जाहीर केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्रीराम मंदिर जन्मभूमी ट्रस्टचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत असेल, असं याच दिवशी केंद्रीय गृहविभागाने पत्रक काढून जाहीर केलं होतं. आर -२०, ग्रेटर कैलास पार्ट -१, नवी दिल्ली येथे हे कार्यालय असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times