पुणे, : इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे आज सोपवण्यात आले होते. कारण इऑन मॉर्गन आता दुखापतीमुळे दोन्ही सामने खेळू शकणार नाही. पण कर्णधारपद स्विकारल्यावर बटलरकडून मैदानात दोन मोठ्या चुका झाल्याचे पाहायाला मिळाले. या चुकांचा चांगलाच फटका यावेळी इंग्लंडच्या संघाला बसला.

बटलर यावेळी यष्टीरक्षण करत होता. त्यावेळी बटलरने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सोपा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. विराट हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे विराटचा सोडलेला झेल हा इंग्लंडला चांगलाच महाग पडला. कारण कोहली त्यावेळी ३६ धावांवर फलंदाजी करत होता. यावेळी बटलरने फिरकीपटू आदिल रशिदच्या गोलंदाजीवर कोहलीचा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. या जीवदानाचा चांगाच फायदा कोहलीने उचलला. कोहलीने त्यानंतर अर्धशतकही झळकावले. यावेळी कोहली ६६ धावांवर आऊट झाला. पण यावेळी बटलरने कोणतीही चुक केली नाही. कारण रशिदच्या गोलंदाजीवरच बटलरने कोहलीचा झेल पकडला. पण तोपर्यंत कोहलीने जीवदानानंतर ३० धावा जमवत आपेल अर्धशतक साकारले होते. जर कोहली ३६ धावांवर बाद झाला असता तर इंग्लंडच्या संघाला भारतीय संघावर अधिक दडपण बनवता आले असते, पण तसे मात्र घडले नाही.

बटलरने फक्त कोहलीलाच जीवदान दिले असे नाही तर बटलरने भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्यालाही या सामन्यात जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती ४८व्या षटकात. यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीय टॉपले गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बटलरने हार्दिकचा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी हार्दिकच्या बॅटला चेंडू लागला आणि तो थेट बटलरच्या दिशेने गेला. पण त्यावेळी बटलरला हा झेल टिपता आला नाही. बटलरचा हा चेंडूला लागला आणि त्याने चेंडू अडवला खरा, पण त्यानंतर झेल पकडण्यात मात्र त्याला यश आले नाही. त्यावेळी हार्दिक हा २१ धावांवर खेळत होता. कोहलीने जीवदानानंतर ३० धावा जमवत आपेल अर्धशतक साकारले होते. जर कोहली ३६ धावांवर बाद झाला असता तर इंग्लंडच्या संघाला भारतीय संघावर अधिक दडपण बनवता आले असते, पण तसे मात्र घडले नाही. पण यावेळी जीवदानानंतर पंड्याला १४ धावा जमवता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here