गेल्या वर्षभरात करोनाच्या संकटामुळे इथला दुकानदार, छोटा व्यापारी आणि रिक्षा चालक मेटाकुटीला आला. रोजगारच ठप्प झाल्याने आता खायचे काय असा प्रश्न या लोकांपुढे आ वासून उभा ठाकला. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात लॉकडाउन लागू केल्यानंतर या वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे. आता तर व्यवसाय असाच ठप्प राहिला तर करायचे काय असा प्रश्न या लोकांपुढे निर्माण झाला आहे.
‘…भले दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ’
परभणीतील सेलू येथील व्यापाऱ्यांनी तर एकत्र येत दुकाने उघडण्याची तयारी देखील सुरू केली. लॉकडाउन असतनाही आम्ही दुकाने उघडणार आणि जर आमच्यावर कारवाई झाली तर आम्ही दंडात्मक कार्यवाईला एकत्रितपणे सामोरे जाऊ अशी भूमिका येथील व्यापाऱ्यांची घेतली आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले असून लॉकडाउन त्वरित मागे घ्यावे अशी मागणी व्यापारी करत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आम्ही मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, हात स्वच्छ धुणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करणे हे सर्व नियम पाळू मात्र आम्हाला काही शिथीलता देण्यात यावी, अशी विनंतीही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. इतर शहरांमध्ये ज्या प्रमाणे काही ठराविक कालावधीसाठी बाजार सुरू ठेवण्यात येतो, त्या धर्तीवर सकाळी आणि संध्याकाळी काही वेळेसाठी आम्हाला दुकाने आणि मार्केट सुरू ठेवण्याची सवलत द्यावी. भले शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पूर्ण बंद ठेवले तरी चालेल, अशी कळकळीची विनंती व्यापारी आणि दुकानदारांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
औरंगाबादच्या धर्तीवर परभणीत लॉकडाउन लागू करावा. औरंगाबादला काही प्रमाणात शिथिलता आहे तसे परभणीतही करावे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गरीब वस्तीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांसाठी हा लॉकडाउन अत्यंत अन्यायकारक आहे, सरकारने आमचा विचार करावा असे हातावर पोट असणाऱ्या गरीब वस्तीतील लोक म्हणू लागले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times