वाचा:
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडको परिसरातील राणाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरवात केली. त्यानंतर उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते.
वाचा:
पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेलमालक, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासह करोनाच्या नियमनाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा एकमेव पर्याय आता शिल्लक असल्याचे ते म्हणाले. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times