मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानंतर आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार का याची चर्चा होत असताना आता मुंबईच्या सायबर पोलिसात फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला याबाबत आता चौकशी होणार आहे. (a case has been registered against anonymity in connection with the leaking of the )

आयपीएस रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात एक अहवाल लीक झाला आहे. या अहवालाच्याच आधारे विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईच्या राज्य गुप्त विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. यासाठी कलम ३० भारतीय टेलीग्राफ अॅक्ट १८८५,सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब) ६६ सह द ऑफिशियल सिक्रेट अँक्ट, १९२३ च्या कलम ५ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुंबईच्या गुन्हे शाखेअंतर्गत येणाऱ्या सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
रश्मी शुक्ला यांनी राज्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना भलत्याच व्यक्तींच्या नावे फोन टॅपिंगची परवानगी घेऊन वेगळ्याच व्यक्तींचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. याच फोन टॅपिंगचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केला असा खळबळजनक आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यांचे फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. तसेच विरोधी पक्ष भाजपने या अहवालावरुन राज्य सरकार पोलीसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे राज्याचे मुख्य सचिव यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालात स्पष्ट होत आहे. या अहवालावर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अविश्वास व्यक्त केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या अहवालात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना अटकला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काही मंत्री करू लागले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here