मुंबई मंत्रालयाकडून त्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र वन खात्याकडून निर्गमित करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागचा तात्पुरता प्रभार सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार याच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपवण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ यांनी गुरुवारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. त्या नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती.
क्लिक करा आणि वाचा-
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आत्महत्येस जबाबदार आहेत असे दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांनी शिवकुमार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times