मल्टी कमॉडिटी बाजारात आज शुक्रवारी शेवटच्या सत्रात सोने आणि चांदी सावरले. एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोने दरात ८ रुपयांची किरकोळ वाढ झाली. सोन्याचा भाव ४४७०३ रुपये आहे. तत्पूर्वी आज दिवसभरात सोन्याचा भाव ४४४४१ रुपये इतका खाली आला होता. एक किलोसाठी ६४८६६ रुपये आहे. त्याआधी चांदीचा भाव ६४५१६ रुपये इतका खाली आला होता. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७३४.८१ डॉलर आहे. तर चांदीचा भाव २५.१० डॉलर आहे.
good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३७६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४७६० रुपये झाला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत १६० रुपयांची घसरण झाली. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३८५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४७८४० रुपये आहे. त्यात ३०० रुपयांची घसरण झाली.
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२१६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६००० रुपये आहे. त्यात १६० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६९१० रुपये आहे.
युरोप व भारतात कोव्हिड-१९ चे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.४ टक्क्यांनी वाढले व ते १७३४.२ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात सहजता आल्याने मौल्यवान धातूच्या मागणीत आणखी वाढ झाली. भारत आणि युरोपात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने नव्या लॉकडाऊनची शक्यता आहे. यामुळे बाजारातील जोखिमीच्या व्यवहारांवर परिणाम झाला आणि सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times