पुणे, : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. त्यानंतर हार्दिक इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनच्या दिशेने धावत गेल्याचेही पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या सामन्यात हार्दिक चांगली फटकेबाजी करत होता. त्यावेळी सॅमने एक चेंडू पंड्याला टाकला आणि त्यावर पंड्याला एकही धाव काढता आली नाही. पंड्याची बॅटही यावेळी चेंडूला लागली शकली नाही आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेला. त्यावेळी सॅम करन हार्दिकच्या दिशेने जाऊ काही तरी बोलल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर पंड्या भडकल्याचे पाहायला मिळाले.

सॅमने काही शब्द वापरल्यावर हार्दिक त्याच्या दिशेने धावत गेला आणि त्यावेळी आता मोडा राडा होणार, असे पंचांनाही वाटले. पंड्याने धावत जात यावेळी करनचा समाचार घ्यायचे ठरवले होते. त्यावेळी पंड्या करनबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी करन हा त्याच्यापासून थोडा लांब गेला होता. त्यावेळी पंचांनी हस्तक्षेप केला आणि हार्दिकला शांत राहायला सांगितले. हार्दिकने यावेळी करन नेमकं काय बोलत होता आणि मी असे वर्तन का केले, हे सांगत होता. त्यानंतर हार्दिक हा पंचांशी बोलून झाल्यावर दुसरीकडे पाहात होता. तेव्हा पुन्हा एकदा करन त्याच्याबरोबर बोलायला आला होता. पण तोपर्यंत हार्दिकही शांत झाला होता आणि पंचांनीही हस्तक्षेप करत हे सर्व प्रकरण थांबवले होते.

सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण गेल्या सामन्यात ९८ धावांची खेळी साकारणारा शखर धवन यावेळी फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मालाही २५ धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतरही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार खेळी साकारली. लोकेश राहुलने यावेळी शतक झळकावले, तर विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी यावेळी अर्धशतक झळकावले. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३३६ धावांचा डोंगर उभारता आला. त्याचबरोबर अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय संघाने तब्बल १२६ धावा फटकावल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here