मुंबई: राज्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ८२ हजार ४५१ इतकी झाली आहे. ( )

वाचा:

राज्यावरील करोना संकट भीषण होत चालले आहे. राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री यांनी आज महत्त्वाची बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीतच राज्यात रविवार दिनांक २८ मार्चपासून रात्रीची लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले व कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी येत्या काही दिवसांत लॉकडाऊनसारखा निर्णय घेतला जाण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीनंतर करोनाची आजची आकडेवारी हाती आली असून हे आकडे धडकी भरवणारे आहेत.

वाचा:

राज्यात आज ३६ हजार ९०२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजवरचा हा एका दिवसातील उच्चांक ठरला आहे. आज ११२ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्के इतका आहे. दिवसभरात १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत १ कोटी ९० लाख ३५ हजार ४३९ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील २६ लाख ३७ हजार ७३५ (१३.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख २९ हजार ९९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १४ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या आणखी जवळ गेली आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ५२ हजार ३४० रुग्ण जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा ३८ हजार ३४८, पालिका क्षेत्रात ३६ हजार ४०४ तर ठाणे जिल्ह्यात २७ हजार ४७४ इतका आहे. नाशिकमध्येही आकडे वेगाने वाढत असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आज २० हजारपार गेली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here