म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस खात्यातील सरकारी अहवाल गोपनीय होता, तो बाहेर गेलाच कसा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केलेल्या यांनी हा गोपनीय अहवाल फोडलाच कसा, याची चौकशी करा अशी मागणी गृहराज्यमंत्री यांनी केली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आणखी किती आमदारांवर भाजप प्रवेशासाठी दबाव आणला हे लवकरच बाहेर येईल असेही सुतोवाच पाटील यांनी केले. (how did fadnavis leak the ask state minister )

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारी यंत्रणेचा वापर करत राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत होते. त्यासाठी सरकारी यंत्रणाच त्यांनी कामाला लावली होती. याच जोरावर ते आम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार असे म्हणत होते. काही अधिकारी त्यांच्यासाठी काम करत होते. ते आता उघड होत आहे.

पोलिस खात्यातील गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्यांच्या हातात गेलाच कसा असा सवाल करून ते म्हणाले, फडणवीस यांनी देखील गोपनीय कायद्याचा भंग केला आहे. तो त्यांना कसा मिळाला हे त्यांनी सांगायला हवे. त्यांच्याकडून या पद्धतीने गोपनीयतेच्या कायद्याचा भंग होणे अपेक्षित नाही. कारण त्यांनी एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असल्याचे स्पष्ट करून मंत्री पाटील म्हणाले, भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीत येण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार फुटू नयेत म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सतत सरकार पडणार असल्याच्या बाता मारत आहेत. भाजपचे सरकार येणार आहे, असे सांगून आमदारांना थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही त्यांनी मारला.

क्लिक करा आणि वाचा-

आणखी काय म्हणाले सतेज पाटील?
> केंद्राच्या एकाधिकारशाहीला अनेक अधिकाऱ्यांचा बळी
> गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे
> आघाडी भक्कम, विरोधकांनी विरोधी पक्ष म्हणून काम करावे
> भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here