पालघर: वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईला लागून असेलल्या जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. पालघर जिल्हा प्रशासनाने अनेक नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून येत्या ५ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ( )

वाचा:

पालघर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे एकूण ५२ हजार २६९ रुग्ण आढळले असून त्यातील ४८ हजार ८११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर ९६७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ४८१ इतकी आहे. पालघरमध्ये आज १३० नवे रुग्ण आढळले तर क्षेत्रात २१६ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊनच निर्बंध कठोर करण्यात आले आहेत.

वाचा:

जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार शॉपिंग मॉल, दुकाने आणि अन्य आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत. बार आणि रेस्टॉरंट सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील तर खाद्य पदार्थ आणि अन्य सामानाची होम डीलिव्हरी रात्री १० वाजेपर्यंत करता येणार आहे.

वाचा:

जिल्ह्यात १५ एप्रिलनंतर विवाह समारंभास मनाई करण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत जे विवाह सोहळे असतील ते सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या वेळेत ठेवावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. विवाह सोहळ्यासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी २० जणच उपस्थित राहू शकतील. सर्व धार्मिक स्थळे सायंकाळी सात वाजता बंद करण्यात यावीत. फेरीवाल्यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंतच व्यवसाय करता येईल, असेही नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश ५ एप्रिलपासून जिल्ह्यात लागू असणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here