नवी दिल्लीः भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश आहे. चीन विकास हा धडा आहे, अशा दृष्टीने आपण पाहतो, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ( ) हे एका कार्यक्रमात म्हणाले. अलिकडेच पाकिस्ता आणि भारताच्या मिलिटरी ऑपरेशनच्या महासंचालकांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याचा एका महत्त्वाचा करार झाला आहे. हा करार नियंत्रण रेषेवरील गोळीबार रोखण्यासाठी झाला आहे, असं एस. जयशंकर म्हणाले.

भारताला पाकिस्तानसोबत एका सामान्य शेजाऱ्यासारखे संबंध हवे आहेत. प्रत्येकाला याचा अर्थ माहिती आहे. आपण त्या दिशेने पुढे गेलो तर स्वागतार्ह आहे, असं एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं.

अफगाणिस्तानमध्ये सार्वभौम लोकशाही व्यवस्था हवी

भारताला अफगाणिस्तानमध्ये सार्वभौम लोकशाही व्यवस्था हवी आहे. हे तिथे राहणाऱ्या अल्पसंख्यास समाजाच्या हिताचे असेल. अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि पुनर्वसनाच्या बाजुने आहे. यामुळे तालिबानकडून आपल्याला आपेक्षा आहेत. सध्या आपण वेट अँड वॉचच्या स्थितीत आहोत, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं.

जागतिक अर्थव्यवस्थेत चीन वेगाने पुढे जाणारा देश आहे. यावर कुठलंही दुमत नाही. यासाठी गेल्या ४० वर्षांत केल्या गेलेल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. चीनने पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन असताना याची सुरवात झाली होती. पश्चिमेतील देशांच्या विचाराविरोधात जाऊन चीनने आपला विकास केला. भविष्या जागतिक स्थिती कशी असेल, याचा अंदाज आता लावणं कठीण आहे, असं ते म्हणाले.

भारताला आपल्या क्षमता विकसित करून स्पर्धात्मक वृत्ती वाढवली पाहिजे. हे काही आपले राजकीय विचार नाहीत. तर आपण केलेल्या आकलनावरील हे आपले वैयक्तीक विचार आहेत, असं एस. जयशंकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here