कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपने केलेल्या सिंडीकेटच्या आरोपांवर त्यांनी पलटवार केला. भाजपकडे दोन सिंडीकेट आहेत. एक दंगे भडकवतात. आणि दुसरे देशाच्या आर्थिक विकासाची गती धीमी करून फक्त दाढी वाढवत आहेत. कधी आपल्याला गांधीजी आणि रविंद्रनाथ टागौर यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतात करत कधी स्वतःला स्वामी विवेकानंत म्हणवतात. एवढचं नव्हे तर स्टेडियमला आपलं नाह देतात. एक दिवस ते देशही विकायला काढतील आणि त्याला आपलं नाव देतील, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

हे आत्मकेंद्री नेते आहेत. स्टेडियमला आपलं नाव देतात आणि करोना व्हायरसवरील लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो छापतात. इस्रोद्वारे ते आपला फोटो अंतराळात पाठवतात. एक दिवस ते हा देश आपल्या नावावर करतील, असा घणाघात ममतांनी केला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्चपासून २९ मार्चपर्यंत हे ८ टप्प्यात मतदान होईल. विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यानुसार आज ३० जागांसाठी मतदान होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here