कैरो, इजिप्तः इजिप्तच्या दक्षिणेत शुक्रवारी रेल्वेचा मोठा भीषण अपघात झाला. दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाली. या भीषण अपघातात ३२ जण ठार झाले. तर ६६ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर सोहाग प्रांतातील ताहाटा जिल्ह्यात अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. ताहटा जिल्हा हा इजिप्तची राजनाधानी कैरोपासून ४६० किलोमीटर आहे.

रेल्वे दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला असून ६६ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आलीय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात रेल्वे गाड्यांचे डबे पलटल्याचं दिसून येतंय.

इजिप्तमध्ये अलिकडच्या काही वर्षात मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. पायाभूत सुविधा आणि देखभालीच्या अभावामुळे हे अपघात होत असल्याचं सांगण्यात येतंय. २००२ मध्ये असाच एक अपघात झाला होता. त्यात ३७३ जणांचा मृत्यू झाला होता. भरलेल्या ट्रेनमध्ये आग लागल्याने ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर गेल्यावर्षी मार्चमध्ये कैरोमध्ये दोन गाड्यांची धडक झाली होती. त्यात १३ जण जखमी झाले होते. यानंतर रेल्वे सेवा काही कालावधीसाठी थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. पण खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचं त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्रेनमध्ये आग लागल्याने २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here