अमरावती: करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले असतानाच काही दिवसांपूर्वी करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यात मात्र विवाह समारंभांबाबत काहीसा दिलासा देणारा निर्णय झाला आहे. ( )

वाचा:

अमरावती जिल्ह्यात आणखी शिथील करताना लग्नसमारंभाला घालण्यात आलेली २५ जणांच्या उपस्थितीची मर्यादा ५० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वर, वधू, नातेवाईक, पुरोहित, आचारी व वाजंत्री असे मिळून ५० व्यक्तींना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येणार आहे. त्याशिवाय, विना वातानुकुलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचा आदेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लग्नसमारंभ आयोजित करता येणार आहे. लग्नसमारंभ वर किंवा वधूचे घर, त्याचप्रमाणे, नॉन एसी मंगल कार्यालये, खुले लॉन, सभागृहात करता येईल. मात्र, एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्नस्थळीच वाद्ये वाजविण्याची मुभा असेल. त्याचप्रमाणे त्यांना करणे बंधनकारक राहणार आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर बाळगणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे व अन्य सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. कुठेही नियमभंग झाल्याचे आढळल्यास आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

लेखी स्वरूपात परवानगी आवश्यक

लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींची यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा दंडाधिकारी नवाल यांनी दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here