नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीत पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३० मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे तिथे यापूर्वी हिंसक घटना घडल्या आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच आज आसाममध्येही पहिल्या टप्प्यात ४७ जागांवर मतदान होतंय.

Live अपडेट :

– पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत

– बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० जागांवर १९१ उमेदवार तर आसाममध्ये ४७ जागांवर २६७ उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत. बंगालमध्ये एकूण आठ आणि आसाममध्ये तीन चरणांत मतदान होणार आहे

– मतदानाला सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरुवात झालीय. कोविड नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी मतदानाची वेळ एक तासांकरता वाढवण्यात आलीय. त्यामुळे सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहील.

– पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान

– पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैकी ३० जागांवर आज मतदान

– पहिल्या टप्प्यात राज्यातील पुरुलिया, बांकुरा, पश्चिम मिदनापूर, झारग्राम आणि पूर्व मिदनापूर या पाच जिल्ह्यांत होतंय मतदान

– यापूर्वीच्या हिंसक आणि अशांतता पसरवण्याच्या घटना पाहता सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त. पाच जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेणे हे आयोगाचे मुख्य लक्ष्य आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here