बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. हे आंदोलन माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनांपैकी होतं. तेव्हा मी २०-२२ वर्षांचा असेन. पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशी नागरिकांवर केलेल्या अत्याचाराची छायाचित्रं पाहून अनेक दिवस आम्हाला झोपही लागली नव्हती. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल जी भावना बांगलादेशात होती, तितकीच ती भारतात होती,’ असं मोदी यांनी काल आपल्या भाषणात नमूद केलं होतं.
वाचा:
मोदी यांच्या या भाषणाचं ‘राजकीय’ विश्लेषण सध्या भारतात सुरू आहे. विरोधकांनी मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. खरंच, मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते का, यावरून चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदींना टोला हाणला आहे.
‘मोदीजी, आणखी किती फेकणार? आमच्या मराठीत एक म्हण आहे, हद्द झाली राव!,’ असं पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही आपल्या तोंडातून निघाला नाही आणि स्वातंत्र्याच्या बाता मारण्यासाठी बांगलादेशात जाता? शेतकऱ्यांना आपण ‘आंदोलनजीवी’ म्हणाला होतात. मग आपण कोण आहात, ‘ढोंगजीवी’?,’ असा चिमटाही पटोले यांनी काढला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times