म. टा. प्रतिनिधी,

लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट बाजारपेठेला लागलेली आग नियंत्रणात आल्यावर घरी परतत असताना झालेल्या पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचे निधन झाले. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. (Superintendent of died in Accident)

वाचा:

फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागल्यानंतर प्रकाश हसबे तातडीने घटना स्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आल्यावर सकाळी आढावा घेतल्यावर कर्मचाऱ्यांना ‘दोन तासांत परत येतो’ असे सांगून ते घरी निघाले. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीएमपी बसने त्यांना उडवले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वाचा:

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी प्रकाश हसबे यांचे अपघाती निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here