नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणानं आणखीन एक रेकॉर्ड गाठलाय. भारतात एका दिवसात ६२ हजार २५८ रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ कोटी १९ लाख ०८ हजार ९१० वर पोहचलीय.

करोना संक्रमणामुळे शुक्रवारी २९१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. यानंतर करोना संक्रमणामुळे प्राण गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या १ लाख ६१ हजार २४० वर पोहचलीय.

देशात सध्या तब्बल ४ लाख ५२ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल १ कोटी १२ लाख ९५ हजार ०२३ रुग्णांना करोना संक्रमणावर मात केलीय.

उल्लेखनीय म्हणजे १६ ऑक्टोबर २०२० नंतर आज सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. १६ ऑक्टोबर २०२० मध्ये सर्वाधिक ६३ हजार ३७१ रुग्ण आढळले होते.

चिंतेची बाब म्हणजे, करोनाच्या रिकव्हरी रेटमध्येही बदल पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड १९ चा ९४.८ टक्क्यांवर पोहचलाय तर मृत्यू दर १.३५ टक्क्यांवर आहे.

राज्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी सुरूवातीपासूनच करोना संक्रमणाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३६ हजार ९०२ रुग्ण आढळले आहेत.

रुग्णसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाब आहे. इथे ३ हजार १२२ रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय छत्तीसगडमध्ये २ हजार ६५५, कर्नाटकमध्ये २ हजार ५६६ आणि गुजरातमध्ये २ हजार १९० रुग्ण आढळले आहेत.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ११२,, पंजाबमध्ये ५९, छत्तीसगडमध्ये २२, केरळमध्ये १४ आणि कर्नाटकात १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here