वाचा:
यवतमाळ जिल्ह्यातील वडद गावातील बाळू राठोड कुटुंबाच्या बाबतीत हा पुनर्मिलनाचा योग जुळून आला आहे. ऊसतोड कामगार असलेले बाळू राठोड साडेतीन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नाशिकला जात होते. नाशिक रेल्वे स्थानकावर बाळू राठोड, त्यांची पत्नी अर्चना व छोटा मुलगा कुमार यांची ताटातूट झाली. दोघे जण हरवल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
कुटुंबापासून दूर झालेल्या कुमारला आणि अर्चनाला शोधणं हे एक आव्हानच होतं. कारण, कुमार हा अवघ्या सात वर्षांचा होता. तर, अर्चना राठोड मानसिक रुग्ण होत्या. अर्चना राठोड यांचा शोध सुरतच्या महिला आश्रमात लागला. तर, कुमारच्या बाबतीत दोन वर्षांआधी राठोड कुटुंबीयांना आशेचा किरण दिसला. वाशीमच्या महिला व बालविकास कार्यालयात एके दिवशी चेन्नई महिला आणि बालकल्याण विभागातून फोन आला. सात वर्षांचा एक बालक ‘वाशीम’चं नाव घेतोय. त्याला फक्त दोन शब्द बोलता येतात आणि ते शब्द म्हणजे ‘वाशीम’ आणि दुसरा शब्द म्हणजे बंजारा भाषेतील ‘याडी’, असं चेन्नईतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
वाचा:
‘याडी’ शब्दाचा अर्थ म्हणजे ‘आई’ हे त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुभाष राठोड यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच हालचाल केली. कुणी बेपत्ता झालं आहे का याची माहिती घेतली. सगळी माहिती मिळाल्यावर त्याची खातरजमा केली आणि ते मुलाला वाशीम इथं घेऊन आले. कुमारला वडिलांच्या स्वाधीन केलं. एकत्र आलेलं हे कुटुंब पाहून सर्वांचे डोळे पाणावले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times