कोलकाता : च्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील एकूण ३० मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे. याच दरम्यान कांथी भागात नेते यांचा भाऊ यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय.

या हल्ल्यात सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अधिकारी यांनी केलाय.

‘ ब्लॉक अध्यक्ष राम गोविंद दास आणि त्यांची पत्नी यांच्या देखरेखीखाली तीन मतदान केंद्रांवर गोंधळ सुरू होता. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा त्यांना मनमानी करता येईना, त्यामुळे त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि माझ्या गाडीच्या चालकाला मारहाण केली’ असा दावा सौमेंदू अधिकारी यांनी केलाय.

या हल्ल्यात अधिकारी यांच्या गाडीच्या चालकाला दुखापत झालीय. अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.

यापूर्वी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याच्या गारघेटा विधानसभा मतदारसंघातील सीपीएम उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. तसंच मतदानाची सुरूवात होण्याअगोदरच पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघ सतसतमलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पुरुलियाच्या नऊ, बाकुडाच्या चार, झाडग्रामच्या चार, पश्चिम मेदिनीपूरच्या सहा जागांशिवाय पूर्वी मेदिनीपूरच्या महत्त्वपूर्ण अशा सात जागांवर मतदान सुरू आहे. हा भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. कडक सुरक्षेत या भागात मतदान सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here